Today’s Maeket : महाराष्ट्रतील कांद्याचे भाव आज 7000 हजार रुपयांवर जाऊन पोहचले, कांद्याला आली मोठ्या प्रमाणात मागणी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ ते दहा दिवसांपासून कांद्याचे भाव वाढत आहेत. मागील आठवड्यात पाच हजारांच्या घरात असलेला दर बुधवारी सहा हजारांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे पांढऱ्यापेक्षा लाल कांद्याचा दर वाढला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. मंचर बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 7250/- रुपये दर मिळाला. अधिक माहिती वाचा 

सोलापूर बाजार समिती हे भारतातील सर्वात मोठे कांदा बाजार आहे. येथे दररोज सरासरी १५० ते २०० ट्रक कांद्याची आवक होते. यंदा पाऊस लांबल्याने आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळमधून कांद्याची मागणी वाढल्याने दरात वाढत आहे. मागील आठवड्यात पांढऱ्या कांद्याला ५१०० रुपयांचा दर मिळाला होता. सोलापूर बाजार समितीत पांढरा कांदा कमी असतो. 

कांद्याचे भाव वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. गेल्या काही वर्षांपासून कांद्याचे भाव खाली होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आता कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. 

कांद्याचे बाजारभाव पहा 

Leave a Comment

Close Help dada